महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी मुंबई बनली आता आशियातील अब्जाधीशांची राजधानी

GST 4 YOU

महाराष्ट्राची  राजधानी, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने आता बिजींगला मागे टाकत आशियातील सर्वाधिक अब्जाधीशांचे शहर बनण्याचा दर्जा प्राप्त केला आहे. हूरून रिसर्च इन्स्टिट्यूट ने मंगळवारी जाहीर केलेल्या ग्लोबल रीच लिस्ट 2024 मध्ये मुंबईने 92 अब्जाधीशांसह आशियाई देशांमध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. मुंबईने  आपली प्रतिष्ठा वाढवली तर दिल्ली आता प्रथमच या यादीत सामील झाली आहे .

    हूरून च्या मते 119 अब्जाधीश असलेले  न्यूयार्क हे प्रथम क्रमांकावर तर 97 अब्जाधीश असलेले  लंडन हे द्वितीय क्रमांक वर असून या यादीनुसार 92 अब्जाधीश असलेले मुंबई जगात तिसऱ्या क्रमांकाचे तर आशियातील पहिल्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. 603 चौ .किमी क्षेत्र असलेल्या मुंबईने यापूर्वी आशिया तील प्रथम क्रमांकाचे असलेल्या 16000 चौ . किमी क्षेत्राच्या बीजिंगला  मागे टाकले आहे. जगातील सर्वात वेगाने वाढणारे शहर  मुंबईत आता 92 अब्जाधीश आहेत तर मुंबई खालोखाल बीजिंग मध्ये ही संख्या 91 आहे .
     एकूण भारतात आता 271 अब्जाधीश आहेत. गेल्या एकाच वर्षात मुंबईत 26 नवीन अब्जाधीश निर्माण झाले असून त्यामुळे हे शहर अब्जाधीशांच्या बाबतीत जगात तिसऱ्या तर आशियात पहिल्या क्रमांकावर आले आहे.
जागतिक आर्थिक आव्हानांना तोंड देत भारताने आपल्या संपत्तीत मोठी वाढ केली आहे. नवीन अब्जाधीशांमध्ये प्रामुख्याने फार्मास्यूटिकल, ऑटोमोबाईल, केमिकल उद्योग, रियल इस्टेट आदी  क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे.