कॉमन ईमेल किंवा मोबाइलद्वारे दाखल केलेले आयकर परतावे किंवा टीडीएस क्रेडिट येणार आय कर विभागाच्या रडार वर ...उच्च जोखीम कर परतावा प्रकरणे तपासणी

GST 4 YOU

संबंधितांनी दिलेल्या माहिती नुसार ज्या आयकर परताव्यामध्ये मध्ये कॉमन ईमेल आयडी किंवा मोबाइल नंबर नोंदवला गेला आहे, असे संशयास्पद क्लस्टर्स मधील आयकर परतावे, काही नियमांच्या आधारे विभागांकडून ओळखले गेले आहेत. अशा उच्च-जोखीम क्लस्टर्सचे तपशील संबंधित सेंट्रल रजिस्ट्री युनिट चे (CRU) नोडल अधिकारी याचे कडे पाठवले जात आहेत. परताव्याचे खोटे दावे संघटित रीतीने किंवा एकाच प्रमुख व्यक्तीद्वारे केले गेले आहेत याची कसून पडताळणी करण्यात येत आहे, असे एका अंतर्गत परिपत्रकात प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.
तज्ञांच्या मते, हे अंतर्गत परिपत्रक प्रामुख्याने असे करदाते ,ज्यांनी त्यांचे आयकर रिटर्न/परतावे (ITR) सामायिक ई मेल व मोबाईल क्रमांका द्वारे भरले असून, यातील कर विभागाला संशयास्पद वाटणाऱ्या कर परताव्याचा छाननीत समावेश आहे. तथापि, सर्वच कर परतावे या छाननी खाली येणार नाहीत.