जीएसटी व्याज व दंड माफी अभय योजना - राहिले फक्त ४ दिवस - अर्ज भरण्याची मुदत 30 जून पर्यंतच...

GST 4 YOU
जीएसटी कायदा, कलम 73 खाली येणाऱ्या प्रकरणासाठी व्याज व दंड बाकी साठी अभय योजनेची  अंतिम मुदत 30 जून  पर्यंत असून , ज्या करदात्यांनी यापूर्वी कराचा भरणा केला आहे ,त्यांना जीएसटी कायदा, 2017 कलम 128A अंतर्गत SPL-01/ 02 दाखल करणे गरजेचे आहे. हे  करताना, त्यातील कर भरणा  तपशील  भरताना काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे  निदर्शनास आल्याने शासनाने नुकतेच एक स्पष्टीकरण जारी केले आहे. 
    तांत्रिक अडचणी येत असलेल्या प्रकरणांमध्ये, करदात्यांनी सदर SPL- 01/02  अर्ज दाखल करताना क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून पडताळणीसाठी ऑनलाइन अर्जासोबत संबंधित पेमेंट माहिती संलग्न करून  अपलोड करावी. जरी पेमेंट तपशील आणि मागणी रक्कम जुळत नसली तरी कर दाते आपले अर्ज पोर्टल वर भरावेत.
      जेणे करून करदाते आपले अभय योजनेचे अर्ज वेळेत सादर करून सदर योजनेचा लाभ घेऊ शकतील.