. सुमारे ८९०.५२ कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) च्या कथित अनियमित दाव्यांबद्दल, जमशेदपूर येथील केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिकाऱ्यां कडून २०१८-१९ ते २०२०-२१ या आर्थिक वर्षांसाठी टाटा स्टीलला कारणे दाखवा नोटीस मिळाली आहे.
कंपनीने दिलेल्या नियामक माहितीमध्ये स्टील क्षेत्रातील या प्रमुख कंपनीने त्यांना १३ जून रोजी जारी नोटीस मिळाली असून कंपनीने दावा केलेले इनपुट टॅक्स क्रेडिट का वसूल केले जाऊ नये असा प्रश्न कर विभागाने विचारला आहे ,तसेच त्यावर व्याज आणि दंड आकारण्याच्या मागणीचा देखील समावेश आहे.
नोटीसमध्ये टाटा स्टीलला जमशेदपूर येथील संयुक्त आयुक्त, सीजीएसटी यांच्यासमोर त्यांची बाजू मांडण्यासाठी आणि आरोपांना उत्तर देण्यासाठी ३० दिवसांच्या आत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या वर उत्तर देताना, टाटा स्टीलने म्हटले आहे की कारणे दाखवा नोटीसमध्ये काही तथ्य नसून कंपनी निर्धारित कालावधीत त्यांचे औपचारिक उत्तर दाखल करेल व मागणीला आव्हान देईल.
कंपनीने पुढे सांगितले की या नोटीसचा त्यांच्या चालू आर्थिक किंवा ऑपरेशनल कामगिरीवर कोणताही परिणाम होणार नाही.