अबब...आता एका एकराला दर रु.६२० कोटी! भूखंडाची शेकडो कोटीची उड्डाणे !!

GST 4 YOU
नुकत्याच वरळी येथील  फ्लॅटच्या प्रति चौ .मी. रु. ३०.४५ लाख या दराने झालेल्या अति महाग व्यवहारानंतर आता मुंबईच्या उच्चभ्रू आणि आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मध्ये लक्झरी हॉटेल चेन ‘द लीला’ चालवणाऱ्या श्लॉस बंगलोर कंपनीला एका एकराला दर रु.६२० कोटी दराने मोठी जमीन मिळाली आहे. या प्लॉटवर एक भव्य लक्झरी हॉटेल आणि व्यावसायिक टॉवर उभारण्यात येणार आहे.
8412 चौरस मीटरची जमीन, 250 खोल्यांचे हॉटेल
मुंबई मेट्रोपोलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) ने ब्रुकफिल्ड अ‍ॅसेट मॅनेजमेंट खालील श्लॉस, बंगलोरच्या नेतृत्वाखालील कन्सॉर्शियमला ही जमीन देऊ केली आहे. हा भूखंड  सुमारे 2.1 एकर एवढ्या क्षेत्रात पसरलेला आहे. यासाठी कंपनीन 1,302 कोटी रुपयांचे प्रीमियम भरणार आहे.