आता ग्राहकांना मिळणार प्रकल्पाची पूर्ण माहिती - महारेरा चा प्रकल्पाची पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

GST 4 YOU
बांधकाम प्रकल्पांची  ग्राहकांना प्रकल्पाची प्राथमिक माहिती साठी महारेराने गृहनिर्माण व्हावी या हेतुने प्रकल्पांना महारेरा प्रमाणपत्र आणि त्या सोबतच्या परिशिष्टातच प्रकल्पाची मूलभूत व महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध देण्याचे बंधनकारक केले आहे. 
या पूर्वी प्रमाणपत्रात प्रकल्प, प्रवर्तकाचे नाव, पत्ते दिले जात होते. आता नवीन प्रमाणपत्रात प्रकल्प आणि प्रवर्तकाचे नाव, पत्ते या जुन्या माहितीसह प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ, इमारतीचे व विंगचे नाव किंवा क्रमांक, प्रकल्पातील निवासयोग्य मजले; प्रकल्पातील निवासी, अनिवासी सदनिका, गाळ्यांची संख्या, परवानगी मिळालेल्या मजल्यांची संख्या; चारचाकी, दुचाकी आणि अभ्यागतांसाठीच्या एकूण पार्किंगची संख्या असा सर्व तपशील दिला जाणार आहे.
तर नवीन प्रमाणपत्राच्या परिशिष्टात प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ, इमारतीचे व विंग्जचे नाव किंवा क्रमांक, प्रकल्पातील निवासयोग्य मजले, प्रकल्पातील निवासी सदनिका आणि अनिवासी गाळ्यांची एकूण संख्या, इमारतीला किती मजल्यांपर्यंत परवानगी मिळालेली आहे, याचा तपशील दर्शवणारे प्रारंभ प्रमाणपत्र (सीसी); चारचाकी, दुचाकी आणि अभ्यागतांसाठींच्या एकूण पार्किंगची संख्या हा समग्र तपशील या प्रमाणपत्राच्या परिशिष्टात पहिल्यांदाच असणार आहे.
तसेच या प्रकल्पाच्या प्रवर्तकाने प्रकल्पात काही दुरुस्त्या केल्यास, प्रकल्पाला मुदतवाढ घेतल्यास किंवा प्रकल्पाचे दुसऱ्या प्रवर्तकाकडे हस्तांतरण केल्यास हा तपशीलही या प्रकल्पाला भविष्यात दिल्या जाणाऱ्या सुधारित प्रमाणपत्रात राहणार आहे. हे प्रमाणपत्र प्रकल्पस्थळी, प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ठळकपणे प्रदर्शित करावे लागते. प्रकल्पाच्या नोंदणी क्रमांकाच्या मदतीने प्रकल्पाबाबतची माहिती महारेराच्या संकेतस्थळावर शोधताना पहिल्याच पानावर या प्रमाणपत्राची लिंक असून  याशिवाय प्रकल्पाशी संबंधित सर्व प्राथमिक माहिती क्यूआर कोडमध्ये देऊन सर्व माध्यमांतील जाहिरातींमध्ये प्रकल्पाच्या नोंदणी क्रमांकासोबत छापणे पूर्वीच महारेराने बंधनकारक केलेले आहे. हा क्यूआर कोड स्कॅन करूनही प्रकल्पाशी संबंधित प्राथमिक माहिती मिळवता येऊ शकते.
     घर खरेदीदाराला कायदेशीरदृष्ट्या सक्षम करून या क्षेत्रात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणणारे महत्त्वपूर्ण निर्णय यापूर्वी घेतलेले आहेत. त्यात आश्वासित सेवा सुविधांच्या उपलब्धतेचे तपशील अशा बाबी अपरिवर्तनीय असल्याचे महारेराने पूर्वीच जाहीर केले.
      अशा विविध निर्णयांचा घर खरेदीदारांना मोठ्या प्रमाणात उपयोग होत असून देशातील इतर अनेक विनियामक प्राधिकरणांनीही त्यांच्या क्षेत्रात या निर्णयांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. नोंदणी प्रमाणपत्रात ही माहिती समाविष्ट करण्याचा हा निर्णयही असाच ग्राहकांना चांगल्या प्रकारे मदत करणारा, पथदर्शक आणि महत्त्वपूर्ण आहे असे मत मनोज सौनिक, अध्यक्ष, महारेरा यांनी व्यक्त केले आहे.