तीन वर्षा पेक्षा जुनी जीएसटी विवरण पत्रे सादर करण्यास जुलै २०२५ पासून मनाई - जीएसटी नेटवर्क ची माहिती

GST 4 YOU
   जीएसटी नेटवर्कने शनिवारी स्पष्ट केले की जुलै २०२५ च्या कर कालावधीपासून, जीएसटी करदात्यांना मासिक आणि वार्षिक जीएसटी विवरण पत्रे  हि  त्यांच्या   मूळ दाखल करण्याच्या अंतिम तारखेपासून तीन वर्षांनंतर दाखल करता येणार नाहीत.
      करदाते सदर  विवरण पत्रे   दाखल करण्याच्या अंतिम तारखेपासून तीन वर्षांच्या मुदतीनंतर GSTR-1, GSTR 3B, GSTR-4, GSTR-5, GSTR-5A, GSTR-6, GSTR 7, GSTR 8 आणि GSTR 9 दाखल करू शकणार नाहीत. वेळेच्या बंधनाबाबत वस्तू आणि सेवा कर (GST) कायद्यात हि सुधारणा वित्त कायदा, 2023 द्वारे करण्यात आल्या.
      अशाप्रकारे, दायित्वाच्या देयकाशी संबंधित विवरण पत्रे  यांच्या व्यतिरिक्त, जीएसटी बाह्य पुरवठा परतावा, वार्षिक परतावा आणि स्त्रोतावर गोळा केलेला कर आदी विवरण पत्रे  तीन वर्षांच्या मुदतीनंतर विवरण पत्रे  भरण्यास मनाई असेल. जुलै २०२५ च्या कर कालावधीपासून जीएसटी पोर्टलवर ही बंदी लागू केली जाईल, म्हणूनच, करदात्यांनी त्यांचे रेकॉर्ड तपासून, जर आतापर्यंत जीएसटी विवरण पत्रे  दाखल केली  नसतील तर तात्काळ  दाखल करावीत," असे जीएसटीएन ने  म्हटले आहे.