जीएसटीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा प्रस्तावित- स्वातंत्र्य दिनी मा. पंतप्रधान यांनी केले जीएसटी 2.O चे सुतोवाच

GST 4 YOU
७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) ही एक महत्त्वाची सुधारणा असून ज्याचा देशाला फायदा झाला आहे हे अधोरेखित करतानाच आत्मनिर्भर भारत' निर्माण करण्यासाठी, सरकार जीएसटीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा प्रस्तावित करत आहेत असे स्पष्ट केले.                                                 संरचनात्मक सुधारणा, कर दर सुसूत्रीकरण आणि जीवनमान सुलभ करणे या वर आधारित हे  धोरण असेल असे या संदर्भात अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
        पुढील पिढीतील सुधारणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रमुख क्षेत्रांमध्ये समाजातील सर्व घटकांना, विशेषतः सामान्य माणूस, महिला, विद्यार्थी, मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी कर दरांचे सुसूत्रीकरण करणे समाविष्ट आहे.
इतर सुधारणांमध्ये वस्तू व सेवा वर्गीकरणाशी संबंधित विवाद कमी करणे, विशिष्ट क्षेत्रांमध्ये उलटे शुल्क संरचना दुरुस्त करणे,  दर स्थिरता सुनिश्चित करणे आणि व्यवसाय सुलभता वाढवणे यांचा समावेश असेल.
          जीएसटी सुधारणांमुळे प्रमुख आर्थिक क्षेत्रे बळकट होतील, आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळेल आणि क्षेत्रीय विस्तार शक्य होईल.सामान्य माणूस, शेतकरी, मध्यमवर्ग आणि एमएसएमई यांना दिलासा देणाऱ्या जीएसटी अंतर्गत येणाऱ्या सुधारणांचे महत्त्व मा. पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
 केंद्र सरकारने जीएसटी दर सुसूत्रीकरण आणि सुधारणांबाबतचा प्रस्ताव जीएसटी परिषदेने या मुद्द्याची तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या मंत्र्यांच्या गटाकडे (जीओएम) पाठवला आहे असेही पत्रकात नमूद करण्यात आली आहे