जीएसटी परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक तीन व चार सप्टेंबरला-कर दर कमी करण्यावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता.
August 22, 2025
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या मंत्री गटाच्या बैठकीमध्ये विविध कर दरांच्या बदला बद्दल सहमती झाल्याच्या पार्श्वभूमीवर जीएसटी परिषदेने 56 वी बैठक 3-4 सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे .जीएसटी परिषदेने एका कार्यालयीन टिप्पणी द्वारे ही माहिती दिली आहे. या पूर्वी परिषदेची 55 वी बैठक डिसेंबर 24 मध्ये झाली होती. मंत्री गटाने 12 % व 28% असे दोन कर दर रद्द करण्यास सहमती दर्शवल्यानंतर होत असलेल्या अतिशय महत्त्वपूर्ण अशा या बैठकीतून जीएसटी 2.0 च्या अनुषंगाने सोपी कर प्रणाली, अनुपालन सुलभता व वेगवेगळ्या व्यवसायातील कर भार कमी होणे अपेक्षित आहे.