नव्या जीएसटी सुधारणेमुळे आर्थिक सबलीकरणाचा नवा अध्याय - मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस-जीएसटी 2.0 चे केले स्वागत

GST 4 YOU
नव्या जीएसटी सुधारणा नागरिकांवरील कर भार कमी करणार असून यामार्फत अर्थव्यवस्थेला प्रचंड मोठी चालना मिळेल. ही सुधारणा आर्थिक सबलीकरणाचा नवा अध्याय ठरणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
        जीएसटी सुधारणांचे स्वागत करताना ते म्हणाले महाराष्ट्र हा  कायमच जीएसटीचा लीडर राहिला असून महसूलातील सर्वाधिक  सहभाग हा महाराष्ट्राचा आहे. तसेच अतिशय महत्त्वपूर्ण या सुधारणा मुळे व्यापार ,रोजगार वृद्धी मिळून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. या सुधारणांमुळे शेतकरी, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, महिला, युवक, छोटे व्यापारी तसेच मध्यमवर्ग यांना दिलासा मिळणार आहे. आरोग्यविषयक सेवा अधिक परवडणाऱ्या होतील आणि देशभरातील उद्योग सुलभतेस नवे बळ मिळेल. या ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णयासाठी पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मला सीतारामन यांचे आभार, असेही मा. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.