नुकतीच जीएसटी परिषदेने जीएसटी दर कपातीची घोषणा केली आहे. याला प्रतिसाद देताना वाहनांवरील जीएसटी कपातीच्या संदर्भात "महिंद्रा उद्योग समूह" या बड्या वाहन निर्मिती कंपनीने महत्त्वाची घोषणा केली असून प्रवासी वाहन श्रेणीतील वाहनांच्या दरांमध्ये 1 लाख 56 हजार पर्यंत दर कपात करण्याची घोषणा केली आहे. ग्राहकांनी 22 सप्टेंबर पर्यंत थांबण्याची गरज नसून या नव्या किमती 6 सप्टेंबर पासून लागू होत आहेत असेही कंपनीने एका एक्स पोस्ट द्वारे जाहीर केले आहे. महिंद्रा कंपनीच्या या ग्राहक हिताच्या घोषणेचे ज्येष्ठ उद्योजक व महिंद्रा समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी एक्स पोस्ट द्वारे स्वागत केले आहे.