. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळ - सीबीआयसीच्या असे लक्षात आले आहे की, सीबीआयसीच्या अध्यक्षांचा असल्याचा दावा करणारा एक अनौपचारिक संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित केला जात आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की जीएसटी अंतर्गत काही संक्रमण लाभ २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होतील, ज्यात न वापरलेले सेस क्रेडिट, पूर्ण सवलत दिलेल्या पुरवठ्यांशी संबंधित आयटीसी;नवीन किंमत समायोजन तरतुदी इ. विषय समाविष्ट आहेत.
या संदर्भात सीबीआयसीने एक्स वरील पोस्ट द्वारे असे कळविले आहे की असे दावे तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत. जीएसटी अंतर्गत नेक्स्ट -जेन सुधारणा चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी सामान्य जनता, व्यापार आणि उद्योगातील व्यक्ती तसेच इतर संबंधितांनी फक्त सरकारने जारी केलेल्या अधिकृत सूचना, परिपत्रके, वारंवार विचारले जाणारे प्रश्न इत्यादींचा संदर्भ घ्यावा अशी विनंती आहे.