६ कोटी आयकर विवरण पत्रे (ITR) भरण्याचा टप्पा पार - करदात्यांचे आणि कर सल्लागारांचे आयकर विभागाने मानले आभार

GST 4 YOU
आता पर्यंत  ६ कोटी आयकर विवरण पत्रे  (ITR) भरली  गेली असून हा टप्पा गाठण्यात  मदत केल्याबद्दल करदात्यांचे आणि कर सल्लागारांचे आयकर विभागाने आभार व्यक्त केले आहेत.
    करदात्यांना आयटीआर दाखल करणे, कर भरणे आणि इतर संबंधित सेवांमध्ये मदत करण्यासाठी, विभागाचे हेल्पडेस्क २४x७ कार्यरत आहे असे नमूद करून विभाग कॉल, लाईव्ह चॅट, वेबएक्स सेशन आणि ट्विटर/एक्स द्वारे उपलब्ध आहे.
      ज्या कर दात्यांनी २०२५-२६ मूल्यांकन वर्षा साठी आयटीआर दाखल केलेले नाही, त्यांना शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी लवकरात लवकर विवरण पत्रे दाखल करण्याचे आवाहनही आय कर विभागाने केले आहे.