केंद्रीय जीएसटी व राज्य जीएसटी विभागांना एकाच विषयावर समांतर कार्यवाही करण्यास मा. सर्वोच्च न्यायालयाने केली मनाई- क्रॉस ज्युरिसडिक्शन बाबत महत्त्वपूर्ण निर्णय

GST 4 YOU
मा. सर्वोच्च न्यायालयाने  मे. आर्मर सिक्युरिटी (इंडिया) लिमिटेड वि.आयुक्त, केंद्रीय जीएसटी , दिल्ली पूर्व आयुक्तालय आणि इतर ( Special Leave Petition (C) No. 6092 of 2025 dated August 14, 2025) या केस मध्ये  जीएसटी कायद्याच्या कलम 70 अंतर्गत समन्स जारी करणे हे जीएसटी कायद्याच्या कलम 6(2)(b) च्या अर्थामध्ये "कारवाईची सुरुवात" होत नाही असे स्पष्ट केले. मा. सर्वोच्च न्यायालयाने  एकाच विषयावर वेगवेगळ्या  कर अधिकाऱ्यांचे द्वारे समांतर कार्यवाही करण्यास मनाई केली आणि कार्यवाहीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी  केंद्र आणि राज्य कर अधिकाऱ्यांमध्ये समन्वय सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली.
        मा.सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य अधिकाऱ्यांमध्ये अखंड डेटा आणि गुप्तचर माहिती सामायिक करण्यासाठी एक मजबूत यंत्रणा विकसित करण्यास केंद्रीय जीएसटी गुप्तचर विभाग- डीजीजीआयला सांगितले. यामध्ये गुप्तचर माहितीनुसार केलेल्या कृतींची रिअल-टाइम दृश्यमानता प्रदान करणे, सुसंवाद आणि सहकारी संघराज्यवाद वाढवणे आणि ओव्हरलॅपिंग कार्यवाहीमुळे करदात्यांना होणारा त्रास कमी करणे यांचा समाविष्ट आहे.
     मा. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे क्रॉस ज्युरिसडिक्शन अत्यंत आवश्यक असलेली स्पष्टता आली आहे. यामुळे जीएसटी करप्रणाली अंतर्गत तपास आणि निर्णय प्रक्रिया सुलभ होईल आणि विविध अधिकाऱ्यांकडून करदात्यांना होणारा अनावश्यक त्रास रोखण्यास बळकटी मिळेल.