70 वाहनांचा ताफा, 200 अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने एक हजार कोटी रुपयांवर उलाढाल असणाऱ्या फ्रोजन फूड व्यावसायिक उद्योजक बंधूं वर जीएसटी व आयकर विभागाने संयुक्त छापा जीएसटी व आयकरचा छापा टाकल्याने व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील संभलमध्ये मीट प्लांट मालक बंधू यांच्यासह अनेक मांस व्यावसायिकांच्या घरावर आणि कारखान्यांवर प्राप्तिकर विभाग आणि जीएसटीच्या पथकाने धाडी टाकल्या.
पहाटेच्या सुमारास संभल, बरेली आणि हापूडमध्ये जवळपास ७० कारमधून आलेल्या २०० अधिकाऱ्यांच्या पथकानं धाड टाकली. यानंतर एकच खळबळ उडाली. व्यवसायिकाच्या घरासोबतच चिमयावाली गावातील त्यांच्या प्लांटवरही छापा टाकण्यात आला. या दरम्यान सुरक्षेचा विषय लक्षात घेता चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. कुरेशी बंधू हे इंडिया फ्रोजन फूडचे मालक आहेत. दोन्ही भावांचं कारभार एक हजार कोटी रुपयांच्या घरात जातो. कंपनीच्या ४ बड्या अधिकाऱ्यांच्या घरांवरही धाड टाकण्यात आली.