जीएसटीच्या नावाखाली दहा लाखांची फसवणूक- उद्योजक, व्यवसायिकानी सतर्क राहण्याची गरज- कर सल्लागारासह एका महिलेवर गुन्हा दाखल

GST 4 YOU
      पुणे येथील उद्योजकाने एका कर सल्लागाराला गेल्या दोन वर्षात जीएसटी भरणा करण्यासाठी दिलेली  दहा लाखावर रक्कम त्याने जीएसटी विभागाकडे न भरता स्वतःच्या कामासाठी वापरून कंपनीची फसवणूक केली. अशी तक्रार पोलिसात सदर उद्योजकाने केली आहे.
         कर सल्लागार मिलिंद विठ्ठलराव घाटे , रा. मोरे वस्ती, चिखली व त्याची महिला साथीदार यांच्यावर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हृषीकेश रावजी थोरात रा. भोसरी यांनी या प्रकरणी भोसरी पोलिसात तक्रार दिली. थोरात यांच्या मे.आर डी कार्पोरेशन चे जीएसटी भरण्याचे काम घाटे याने घेतले होते.कर सल्लागार घाटेने जीएसटी पोर्टलवर नोंदी न करता खरेदी-विक्री बिलात फेरफार केला. व फसवणूक केली. ही घटना भोसरीतील धावडे वस्ती येथे जून २०२३ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली.
अशा प्रकरणातून उद्योजक, व्यवसायिकानी सतर्क राहण्याची गरज प्रकर्षाने पुढे आली आहे.