जीएसटी करचोरी रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून कर विभागाचे अधिकारी ई-वे बिलांवर लक्ष ठेवून आहेत. मात्र काही फसवणूक करणारे लोक रिकामे ट्रक चालवून त्यांचं इ वे बिल निर्माण करून, वस्तू च्या आवक जावक याचा पुरावा तयार करून इनपुट टॅक्स क्रेडिट हडप करत असल्याचे जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले असता त्यांनी पाळत ठेवून कारवाई केली.
सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, आकाश कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्लीने वेगवेगळ्या नावांनी ई- वे बिल तयार केले होते. मात्र दिल्लीहून लखनऊला येणारे सदर 3 ट्रक पकडण्यात आले, जे कोणत्याही मालाविना आले होते. मात्र संशयित करदात्या बरोबर काही अधिकाऱ्यांनी त्याच्याशी संगनमत केल्याचे निदर्शनाला आल्याने कर चुकवण्यार्या बरोबरच कर अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. या कर चोरीच्या नवीन प्रकारामुळे अधिकारी चक्रावले आहेत.