सरकार कडून नुकत्याच जारी सूचनेनुसार विवरण पत्र GSTR-3B लॉक करण्याबद्दल आणि ते दुरुस्त न करता येण्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
सध्या GSTR-3B मध्ये नोंदणी नसलेल्या व्यक्ती, कम्पोझिशन करदाते आणि UIN धारकां याना केलेल्या आंतरराज्य पुरवठ्याची माहिती दिली जाते. करदाते ही माहिती एडिट करू शकत होते. पण सरकारला GSTR-1 आणि GSTR-3B मध्ये फरक आढळू लागला. त्यामुळे आता GSTR-1, GSTR-1A आणि IFF मधून ही माहिती आपोआप ऑटो पॉप्युलेट द्वारे भरली जाईल आणि करदात्यांना ती एडिट करता येणार नाही.डिसेंबर २०२५च्या अडव्हायझारीनुसार, नोव्हेंबर २०२५ कर कालावधीपासून हे लॉकिंग लागू होईल.
या लॉकिंगचा GSTR-3B फायलिंगवर होणारा परिणाम म्हणजे सिस्टीम GSTR-1, GSTR-1A आणि IFF मधील माहिती आपोआप भरून देईल. त्यामुळे कोणतीही चूक दुरुस्त करायची असेल तर ती त्या कर कालावधीत GSTR-1A मधून करावी लागेल किंवा पुढील GSTR-1/IFF मध्ये दुरुस्त करावी लागेल. GSTR-1A हीच GSTR-3B भरण्यापूर्वी दुरुस्तीची संधी असेल. त्यामुळे GSTR-1 अचूक भरणे आणि वेळेवर GSTR-1A द्वारे बदल करणे आता अत्यंत महत्त्वाचे आहे.
असे लॉक केल्या मुळे GSTR-1 आणि GSTR-3B मधील फरक संपतील. तसेच GSTR-3B मध्ये फेरफार करणे किंवा चूक होण्याची शक्यता कमी होईल. यामुळे रिटर्नमध्ये खरे आणि अचूक आकडे जातील.
तर यातील तोटे म्हणजे GSTR-1 मधील चूक लगेच दुरुस्त करणे कठीण होईल. आता पोर्टलवरील ऑटो-पॉप्युलेशनवर पूर्ण अवलंबून राहावे लागेल. याच शिवाय GSTR-3B मध्ये तत्काळ दुरुस्तीचा पर्याय असणार नाही.