जीएसटी छाप्यादरम्यान केलेली एक कोटी रुपयांच्या रकमेची जप्ती मा. उच्च न्यायालयाने केली रद्द - व्याजासकट रक्कम परत करण्याचे जीएसटी अधिकाऱ्यांना दिले आदेश

GST 4 YOU
एका महत्त्वपूर्ण निर्णय जीएसटी गुप्तचर  संचलनालय (डीजीजीआय) ने जीएसटी छाप्यादरम्यान केलेली एक कोटी रुपयांच्या जप्तीच्या कारवाईला  मनमानी आणि कायद्याच्या अधिकाराशिवाय" असे म्हणत मा. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या 10 मार्च 2026 च्या आदेशानुसार, याचिकाकर्त्या स्मृती वाघधरे यांनी केलेल्या W.P. No .839/2025 या रिट याचिकेत जीएसटी विभागाने रक्कम जप्तीचे जारी केलेले दोन आदेश रद्द केले आणि मुंबईतील याचिकाकर्त्याकडून जप्त केलेली १ कोटी रुपयांची रोख रक्कम परत करण्याचे निर्देश दिले.
     मा. मुंबई उच्च न्यायालयाचे  खंडपीठाने  निर्णय दिला की जीएसटी इंटेलिजेंस महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) अधिकाऱ्यांनी पैसे जप्त करण्यापूर्वी जीएसटी कायद्यांतर्गत वैधानिक आवश्यकतांचे पालन केले नाही. तसेच जप्त केलेली रोकड पुढील कार्यवाहीसाठी आयकर विभागाकडे सोपवण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली, तेव्हा मा.खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले.
     याचिका कर्त्या स्मृती वाघधरे यांनी 27 जून आणि 28 जून 2023 रोजी फॉर्म GST INS-02 मध्ये जारी केलेल्या जप्ती आदेशांना आव्हान दिले होते. यावर जीएसटी कायद्याअंतर्गत रोख रक्कम  जप्ती करताना  जीएसटी विभागास कायदेशीर अधिकार नसल्याचे स्पष्ट करून सदर रक्कम व्याजासह दोन आठवड्यात याचिकाकर्त्याला परत देण्याचे आदेश मा. न्यायालयाने दिले.